आमच्या कडे 8 तास, 10 तास, 24 तास
घरकाम ,
बाळ सांभाळणे,
पेशंट सांभाळणे,
बाळ बाळंतीण ची काळजी घेणे
अशा कामासाठी महिला, मुली पाहिजेत
Vaishnavi Maid & Nurses Bureau
वैष्णवी मेड अँड नर्सेस ब्युरो
मो. नं.. - 9834689169, 9021469617, 9766273698
चिंचवड ऑफिस - C/o R.D. मोबाईल शॉपी , मोरया निवास रामोर , गांधी पेठ , चिंचवड पुणे 411033
वाघोली ऑफिस - फ्लॅट नं . 103,, D बिल्डिंग, मॅपल आपले घर सोसायटी, वाघोली अनेक्स, वाडेबोलाई पुणे
वैष्णवी ब्युरो मध्ये कॉल केल्याबद्दल तुमचे आभार , वैष्णवी ब्युरो च्या परिवारात आपले स्वागत आहे .
आम्ही गेल्या 10 वर्षांपासून म्हणजे 2013 पासून संपूर्ण पुण्यामध्ये घरकाम, बाळ सांभाळणे, आजी सांभाळणे, पेशंट सांभाळणे साठी महिला व मुली ना कामे देत आहोत.
नियम व अटी
कामाला लावण्याची फीस 1000 रु आहे . ती पहिल्या पगारतून कपात केला जाईल . एका महिन्याच्या आत काम सोडले तरी फीस दयावी लागेल.
प्रत्येक नवीन कामाच्या वेळी 1000 रु काम लावण्याची फीस घेतली जाईल . म्हणून काम बदलू नका . एकाच कामावर टिकून काम करा.
ब्युरो कडून प्रत्येक कामगारांचे व्हेरिफिकेशन केले जाईल त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कामगाराने आणून द्यावी . कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली तर कामावरून काढून टाकण्यात येईल .
काम सोडताना किंवा सुट्टीवर जाताना ब्युरोला व मालकाला 7 दिवस आधी कळवावे. तुमच्या जागी नविन कामगार आल्यावर तुम्ही काम सोडु शकता. न सांगता अचानक काम सोडले तर पगार मिळणार नाही.
जिथे काम करता तेथून पगार घेऊन काम सोडणे. पगार काढून देण्याची जबाबदारी ब्युरोची नाही. ब्यूरो फ़क्त कामाला लावतो कामगाराचा पगार घेत नाही व कामगाराला पगार करत नाही.
मालकाशी कांही तक्रार असल्यास ब्युरोला कळवा परस्पर वाद घालू नका शिविगालि करू नका.
कामावरुण घरी जाताना मालकाकडून बॅग तपासून घ्या राग मानू नका.
मालकाच्या घरी चोरी केल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल
फक्त गरजू बायांना काम मिळेल
टाइमपास साठी काम बघायला येणाऱ्या बायांना पुन्हा काम मिळणार नाही.
ज्या बाया कामाला लावून पण कामाला जात नाहीत. न सांगता सुट्टी घेतात त्यांना परत काम मिळणार नाही.
आम्ही तुमच्या घराजवळ काम देत नाही. ज्यांना घराजवळ काम पाहिजे त्यांनी कॉल करू नका.
घरापासून 5 ते 10 किलोमीटर कामाला जायची तयारी आहे अशा बायांना काम मिळेल.
प्रवास खर्च व जेवण मिळणार नाही. डब्बा घेऊन कामाला जाणे.
सुरवातीला पगार फिक्स आहे . पगार ब्युरो करत नाही . मालक करतात. सुरवातीला पगार वाढवून मिळणार नाही. तुमचे काम चांगले असेल तर भविष्यात मालक पगार वाढवून देईल . परवडत आसेल तरच कॉल करा.
दुसऱ्याचे ऐकून तुमच्या कामाला जाण्याचा निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला म्हणतात मार्केट मध्ये जास्त पगार चालू आहे . ह्या ब्युरो कडे कमी पगार आहे . असे सांगतात . त्यांना सांगा तुम्हाला जास्त पगाराचे काम लावून दाखवावे . अशी माणसे काम देत नाही फक्त फुकटचा सल्ला देतात . व तुम्हाला कामाला जाण्यापासून रोखतात. तुम्हाला घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते . तर तुम्ही स्वतःच्या मनाने व डोक्याने निर्णय घेतला पाहिजे .
आमच्या पेक्षा जास्त जास्त कोणता ब्युरो पगार देत असेल तर त्यांचा नंबर आम्हाला दया. आमच्या कडे भरपूर बाया आहेत त्यांना आम्ही त्या ब्युरो कडून कामाला लावू.
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असे भरपूर बाया वागतात . त्यांना सर्वात जास्त पगार पाहिजे तरच कामाला जातात नाहीतर घरी बसून वेळ वाया घालवतात . पण कामाला जात नाही. त्याना मला असे सांगायचे आहे . तुम्हाला जेव्हा भरपूर पगाराची नोकरी लागेल तेव्हा तुम्ही तेथे कामाला जा पण घरी बसून वेळ व पगार वाया घालवू नका . तुम्हाला घरी बसून कोणी पगार देणार नाही. तुम्ही सोसायटी मध्ये कामाला जा . तेथे ओळख वाढावा व जास्त पगाराची नोकरी मिळाली तर तेथे जॉईन व्हा पण घरी बसून जास्त पगाराची स्वप्न पाहू नका . बाकीच्या बाया एकाच मालकाकडे दोन तीन वर्ष काम करतातात. सर्व कामे शिकून मालकिणीच्या विश्वास जिंकतात मग मनासारखा पगार वाढवून मागतात . अशा बायांना मालकीन सोडत नाही . व पगार वाढवून देतात.
आमचा पगार कोणत्याही ब्युरो पेक्षा कमी नाही. पण सोसायटी मध्ये डायरेक्ट कामाला जातात त्या बाया पेक्षा आमचा पगार कमी आहे. पण कोणत्याच ब्युरो कडून तुम्हाला जास्त पगार मिळणार नाही. जास्त पगार फक्त सोसायटी मध्ये डायरेक्ट कामाला लागल्यावर मिळतो. तेथील बाया महिन्याला 20 ते 25 हजार पगार घेतात. स्वयंपाकाचे एकाघराचे 10 हजार मिळतात, बाळ सांभाळण्याचे 15000 ते 20000 देतात, परदेशात घेऊन गेले तर 50 हजार पण पगार देतात. शनिवार रविवार सुट्टी मिळते, दुपारचे जेवण व नाष्टा मॅडम बनवून देते.बाळ झोपले की आपण पण झोपू शकतो. सुट्टी केली तरी पगार कट होत नाही. दिवाळीला डबल पगार देतात, लाख लाख रुपये उसने देतात, आपल्या मुलाचे शिक्षणाचा खर्च करतात, आपल्या मुलाची लग्नाचा खर्च करतात, अशी खूप सारी छान कामे तुम्हाला फक्त सोसायटी वॉचमन किंवा तुमच्या ओळखीची बाई देऊ शकते, पुण्यातील कोणता ब्युरो देऊ शकत नाही. म्हणून ब्युरो ल कॉल करून तुमचा वेळ वाया घालवू नका. स्वतः काम शोधा.
आपले शुभ चिंतक
सौ . छाया विजय गुंजाळ
श्री . विजय ज्ञानदेव गुंजाळ
Comments
Post a Comment